वाल्मिक कराडला २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी CID ने अटक केल्यांनतर आता बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. असा हा वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे असताना त्यांच्या घरात काम करणारा घरगडी म्हणून ओळखला जात होता. आणि हाच वाल्मिक कराड आज राज्यभर चर्चेचा विषय बनलाय. पण परळीमध्ये पूर्वीपासूनच कराडचं नाव चर्चेत होतं ते म्हणजे त्याची दहशत आणि वेगवेगळ्या मार्गांनी कमावलेल्या संपत्तीमुळे. वाल्मिक कराड जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हापासून नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतायेत.