ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघांत एकूण २४४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मतदारसंघात ६ हजार ८९४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. काल संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत ठाणे शहर मतदार संघात 52 पॉईंट 41 टक्के मतदान झाले. या मतदार संघात तिहेरी लढत झाली, भाजपचे संजय केळकर, शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव यांच्यामध्ये झालेली लढत पाहता या मतदार संघात निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी लढवत होते, यांच्या विरोधात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे केदार दिघे होते.