शासनातर्फे राबविण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर फाउंडेशन योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाखांची मदत केली जाते. जर मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असेल आणि एक व्यक्ती अनुसूचित जातीतील आणि एक दुसऱ्या जातीची असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मुलगा आणि मुलीने हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत लग्नाची नोंदणी केलेली असावी. या योजनेचा लाभ केवळ पहिल्यांदा लग्न करणा-या जोडप्यांनाच मिळू शकतो. आणि हो, या योजनेचा लाभ लग्नाच्या एक वर्षाच्या आतच घेता येईल. डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे अडीच लाख रुपये आणि 50,000 रुपये राज्य शासनातर्फे मिळवायचे असतील तर तुमच्याकडे Income Certificate, Caste Certificate आणि Marriage Certificate असायलाच हवे. दोघांपैकी कुणीही चुकीची माहिती दिली तर त्यांना दंड भरावा लागेल.
हे ही वाचा :
एकाच छताखाली मिळतात, 45 प्रकारचे Shawarma । Shawarmawala In Thane
एकाच छताखाली मिळतात, 45 प्रकारचे Shawarma । Shawarmawala In Thane
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .