चिंचवड विधानसभा मतदार संघावर जगताप कुटुंबाचे २२ वर्षांपासून वर्चस्व राहिलेले आहे, त्यामुळे या निवडणुकीत जगताप यांचे पारडे जड आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे राहुल कलाटे हे सलग तिसऱ्यांदा जगताप कुटुंबाच्या विरोधात निवडणुक लढवत आहेत. पोटनिवडणुकीत काटे आणि कलाटे हे दोघेजण निवडणूक लढवत होते, त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. मात्र, या निवडणुकीत काटे यांनी माघार घेऊन जगताप यांना आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे कलाटे आणि जगताप यांच्यामध्ये होणारी लढत किती चुरशीची होणार हे पाहावे लागेल.