जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल सायंकाळी (22 जानेवारी) झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 13 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून हे सर्व प्रवाशी पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express Accident) होते. एका अफवेमुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे.