सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलीये. मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, सरकार कुणाचेही असो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, यासाठी मुंबई इथं आझाद मैदानावरही आंदोलन करण्याची वेळ आल्यास मागे हटणार नाहीये, असा विधानसभा निवडणुकीच्या खूप मोठ्या ब्रेकनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन 2.O अशा ऍटीट्युडन नव्यानं मैदानात उतरण्याचा घेतलेला हा निर्णय.