मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, या नगरात कला असो व राजकारण सगळ्यांनाच वाव मिळतो. मुंबईत अनेक प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट, टूर्नामेंट होतात असाच हा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल फेमस आहे. या वर्षी या महोत्सवाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे २५वे रोप्यमहोत्सवी वर्ष खास ठरणार आहे. तर आज जाणून घेउया या काला घोडा आर्ट महोत्सवाबद्दल. मुंबईतील कला क्षेत्राचा एक महत्वाचा आधारस्तंभ असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिवल दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो. मात्र, यावर्षी २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा महोत्सव सुरु होणार आहे. यंदाची थीम चांदीचा घोडा असणार आहे. तर रोप्यमहोत्सवी वर्षामुळे अनेक नाटक सादर होणार आहेत. या कला महोत्सवात आपल्याला शिल्पकला, चित्रकला, छायाचित्रण,नृत्य यांचा समावेश असणार आहे. काला घोडा आर्ट फेस्टिवल १९९९ पासून मुंबईच्या काला घोडा स्ट्रीट वर भरवला जातो. या महोत्सवाला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून देखील ओळखले जाते. तर नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी खुले व्यासपीठ देखील या फेस्टिवल मुळे मिळते. हा फेस्टिवल काला घोडा असोसीयेशन NGO मार्फत राबविण्यात येतो. मुंबईतील काला घोडा परिसरातील प्रसिद्ध काळ्या घोड्यावरून या महोत्सवाला काला घोडा हे नाव पडले आहे.
Latest Posts
Kala Ghoda Art Festival 2025 ! २५वे रौप्य महोत्सव वर्ष
मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, या नगरात कला असो व राजकारण सगळ्यांनाच वाव मिळतो. मुंबईत अनेक प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट, टूर्नामेंट होतात असाच हा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल फेमस आहे. या वर्षी या महोत्सवाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे २५वे रोप्यमहोत्सवी वर्ष खास ठरणार आहे. तर आज जाणून घेउया या काला घोडा आर्ट महोत्सवाबद्दल. मुंबईतील कला क्षेत्राचा एक महत्वाचा आधारस्तंभ असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिवल दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो.
