२०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भीमराव तापकीर खूप कमी मताने विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी त्यांना चांगले आव्हान दिले होते. यंदा पुन्हा एकदा हे दोघे आमनेसामने आहेत. यावेळी मनसेने माजी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्याचा काय परिणाम होणार? हा मतदारसंघ शहरी भाग आणि ग्रामीण असा दोन्ही भाग असलेला आहे. मतदारसंघातील वारजे भागात सचिन दोडके आणि मयुरेश वांजळे यांचे काम आहे. त्याचा काय परिणाम होईल. मतदारसंघात नव्याने कोणताचा प्रकल्प आला नाही, अशी ओरड आहे. हे सगळे घटक बघता तिथे वारं फिरणार का, तेच सांगणारा हा व्हिडीओ.