गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. तब्बल १९ दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला. या मुद्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आत या संपूर्ण प्रकरणात किरण माने यांनी एन्ट्री घेतली आहे.