महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी २० नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान पार पडले. आज २३ नोव्हेंबरला विधानसभेच्या मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासाठी आज फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण राज्याची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, हे आज अखेर समजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढतीत कोण जिंकणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.