Manoj Jarange Patil On Vidhansabha Election २०२४ Result : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी या जाहीर झालेल्या निकालावरती भाष्य केलं आहे. काय म्हणाले जरांगे फॅक्टरवर? झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा विजय झाला आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अरे आम्ही मैदानातच नाहीत, तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयर सुतकाच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल आहे. तुम्ही मराठ्यांची मत गोड बोलून घेतली. पण ठीक आहे, उद्या आमचा आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल आहे.
मनोज जरांगे यांचं वक्तव्य
काल जाहीर झालेल्या निवडणुक निकालावर मनोज जरांगे यांनी असं म्हंटल आहे की, एक महिनाभर थांबा, तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. आम्ही जर मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असते. पण आम्ही मराठा समजला सांगितलं होत जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही… मराठ्यांच्या फॅक्टरला बघून यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना.
भुजबळांवर निशाणा
मनोज जरांगे यांनी असं वक्तव्य केलं आहे की, एखाद्या गोष्टीच श्रेय कधी घ्यावं तर मोठं-मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला.. जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखाद्या आमदाराने म्हंटल की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल. तरीही हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता. मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळ बोलत बसतात. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतात. मात्र आम्ही मैदानातच नाही.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”