Saturday, June 3, 2023

Latest Posts

MHADA घराची सोडती २०१९ नंतर आता २०२३ मध्ये | MHADA lottery 2023

म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या (Mumbai Mhada) घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे

म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाच्या (Mumbai Mhada) घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी (House) सोमवारी, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. २२ मे पासूनच नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २६ जूनपर्यंत सुरु राहणार असून १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. अखेर मंडळाने आता ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली असून आता पुढील प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे.म्हाडाच्या घराच्या बाबतीत काही निकष निर्देशित केलेले असतात. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, माध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट यामध्ये विभागलेले असते. त्यांच्या उत्पन्नानुसार माडाची घरे हि त्या त्या प्रकारच्या किमतींचा फरक दिसत असतो.

हे ही वाचा:

उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना दिलासा

SSC आणि HSC चा निकाल कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss