स्व. आनंद दिघे यांच्या २७ जानेवारीला होणाऱ्या जयंती उत्सवाला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी दांडी मारली. वक्फ बोर्डाच्या विषयावर संसदीय स्थायी समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत उपस्थित राहण्याचे पक्ष नेतृत्वाचे आदेश असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. ही बैठक दुपारीच आटोपली तरी रात्री ११ वाजेपर्यंतच्या या उत्सवाला खासदार म्हस्के पोहचले नाहीत याचा अर्थ ठाणेकरांनी काय घ्यायचा?