– फळविक्रेताला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली – मराठी तरुणाला मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली होती – एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना वाद झाला – मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले त्यावरुन वाद झाला – मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”असं बोलू लागला – यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशी यांनी येवून मराठी तरुणाला घेरले – मुंब्र्यात मराठी हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले – घटना मोबाईल कॅमेऱ्यात झाली कैद – मुंब्रा येथील मराठी हिंदी भाषिक वादातील मराठी तरुणाने घेतली मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे – माझे परिवार भयभीत झाले आहे, मुंब्रा मध्ये जाण्याची भिती वाटतेय तेथील लोकांनी धमक्या दिल्यात त्यामुळे मी अविनाश जाधव यांची भेट घेतली असल्याचे या मराठी तरुणाने सांगितले – मुंब्रात जर कोणी आरे केले तर यापुढे आम्ही त्याला कारे करू, मराठी भाषा संदर्भात कोणी काही बोललं तर घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था हे पोलिसांनी पहावे अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे
Avinash Jadhav Exclusive Interview: लोकांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले, आम्ही काम करतो म्हणून ते…