निवडणुकांच्या आधी राज्यातील कुठल्याही नेता मुख्यमंत्र्यांना भेटला नसेल इतक्या वेळा राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. आता तेच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे राहिले आहे. राज ठाकरेचे १३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सत्तेत आम्हीच येणार असेही ते म्हणत आहेत. पाहायला गेलं तर राज ठाकरे स्वतंत्र्य लढत आहेत भारतीय जनता पक्षाच्या खालोखालच्या जागा या राज ठाकरे लढवत आहेत पण त्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने लढवल्या जाणाऱ्या जागांपैकी किती जागा निवडून येतील हे स्वतः राज ठाकरे काय चाणक्य सुद्धा सांगू शकणार नाही अशी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती आहे. तसेच एकीकडे अगदी १३६ उमेदवार निवडून आले तरी ते स्वबळावरही सत्तेत येऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे सभांमधून ते सगळ्याच पक्षांना धू धू धुताहेत.