वादग्रस्त अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंडे यांना मंत्रिमंडळातून out करून छगन भुजबळ यांची वर्णी त्यांच्या जागी लागण्याची शक्यता आहे. तर सरकारच्या आणि गृहमंत्रालयाच्या इभ्रतीचे धिंडवडे काढणाऱ्या वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.