राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis) पक्षात दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी होणार आहे.अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढचे काही दिवस सुनावणी सलग होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार आज दिल्लीत (Sharad Pawar In Delhi) आहेत. त्यामुळे सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
हे ही वाचा :
अभिनेता जितेंद्र जोशी याने वर्ल्डकप हरल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी खास पोस्ट
DR. BABASAHEB AMBEDKAR यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर, विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान