राज्याच्या निर्मिती नंतर पहिल्यांदाच तुफानी संख्याबळ मिळवणाऱ्या भाजपने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या या निर्णयामुळे काहीसे नाराज झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या संधीची कवाडे उघडण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने आपली पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने देत शिंदे यांना ‘चेकमेट’ केले आहे.