सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अत्यंत हीन भाषेत टिका केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलीय. हा प्रक्षोभ लक्षात येताच सदा खोत यांनी माफी मागितली. त्यानंतर खोत यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तितक्याच आक्षेपार्ह भाषेत टिका केल्यावर या सगळ्यांचा दणका भाजपला बसण्याची चिन्हे दिसत आहेत.