आज ३ मार्च २०२५ पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून हे अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी शोकप्रस्तावाआधी विरोधी पक्षनेते यांनी विचारलेल्या प्रश्नावरून विधानपरिषदेत पहिल्याच दिवशी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.