२५ जानेवारीला केंद्र सरकारने २०२५ साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला हा सन्मान जाहीर केला जातो. नंतर राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण पार पडते. यामध्ये पंतप्रधान, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात.पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्यांना काय सुविधा आहेत माहीत आहे का? सोबत रोख रक्कमही मिळते का ? चला जाणू घेऊया.