भारत विरुद्ध ऑस्टेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियामधील हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक असून त्याने १६१ धावांची शतकी खेळी केली आहे. त्याच्यासह भारतीय फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीनेदेखील नाबाद शतकी खेळी केली आहे. यासह भारताने ५३४ धावांची भक्कम लीड घेतली आहे. सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर यशस्वी जयस्वालने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी टाइम महाराष्ट्र सोबत संवाद साधत त्याने सामन्यातील अनुभवावरून भाष्य केले.