spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

सांगलीत पुन्हा पाटीलकीचा खेळ, काँग्रेसला दणका? | Jayashree patil

सागंली विधानसभा मतदारसंघात आता भाजपचे सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळं या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून सांगलीच्या जागेवरील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आला नव्हता. भाजपमधून उमेदवारी न भेटल्याने शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी नाराज होत आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. काँग्रेसमधून उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात देखील केलीये. भाजपला त्यांचे अपक्ष उमेदवार शिवाजी डोंगरे यांची समजूत काढण्यात यश येतं का पाहावं लागेल.

Latest Posts

Don't Miss