सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे २००९ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेच्या गौतम चाबूकस्वारांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात होते, पण रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील निवडणूक लढवली होती. त्यामुळे इथे मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा अण्णा बनसोडे यांना झाला आणि ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. यंदा मात्र, इथले चित्र बदलते का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.