मंत्रालय, दालने, बंगले, पालकमंत्री,संपर्कमंत्री, अधिकारी आणि आता ‘वॅार-रूम’ सारख्या गोष्टी वरून महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या कुरबुरी आता कंटाळवाण्या झाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भेटीत या सगळ्या गोष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कानी घातल्या आहेत. नेत्यांनधील सुंदोपसुंदीने राज्याच्या विकासाचे मात्र तीन तेरा वाजलेत.