निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे १३ दिवस उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाक लावला आहे, सभांचा धुरळा उडालाय. तर आरोप प्रत्यारोपाचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मात्र अश्यातच बोलताना माणसाचं भान सुटलं तर जीभ घसरते. असंच काहीस महायुतीच्या सभेत जतमध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबतही झालं. आणि त्यांच्या त्याच वक्तव्यावरून मात्र अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. त्यानंतर अखेर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.