Thursday, November 30, 2023

Latest Posts

“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणं पडलं महागात, बाप-लेकानं अखेर मागितली माफी

महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि या महाराष्ट्रातील मुबंई ही देखील मराठी माणसांची आहे

महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि या महाराष्ट्रातील मुबंई ही देखील मराठी माणसांची आहे हा विसर मुबंईत राहणाऱ्या परप्रातीयांना पडला असावा हे म्हणायची वेळ आता आली आहे. मुंबईत मराठी माणूस किती टक्के राहिलाय? असा प्रश्न पडला आहे. राजकीय नेतेमंडळी प्रत्येक वेळी इथे प्रत्येकाला येण्याचं स्वातंत्र्य आहे या भूमिकेचं समर्थन करताना दिसतात. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत काही ठिकाणी काही इमारतींमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तींना घरं नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एका महिलेनं सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. हा प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इमारतीतल्या संबंधित व्यक्तींना जाब विचारल्यावर या दोघांनी माफीही मागितली आहे .

नेमका काय आहे प्रकार ?

मुलुंड वेस्टमधल्या तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या असताना. सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही” असं सांगून नकार दिला.ही मुबंई नेमकी कोणाची मराठी लोकांची का गुजरात्यांची असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्यांच्यात व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बापलेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.

तृप्ती देवरुखकर मुलुंड भागात घडला प्रकार सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेन पक्षाने त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली होती . तृप्ती देवरुखकर यांनी म्हंटल आहे कि त्यांनी मला त्या सोसायटीत बोलवून घेतलं आणि त्या दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी माफीही मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असं तृप्ती देवरुखकर यांनी नंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं आहे .

तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी या परप्रातीयांना कळले असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं कोणत्या स्थितीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढा देत असते.

हे ही वाचा: 

मुंबईकर आज बाप्पाला देणार निरोप , बीएमसीने बनवले २०० कृत्रिम तलाव तर सुरक्षेसाठी १९ हजार पोलीस तैनात

संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश, गणेश विसर्जन गुरुवारऐवजी शुक्रवारी तर ईदनिमित्ताने निघणारी मिरवणूक…

Lalbaugcha Raja Visarjan 2023, १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी होणार मार्गस्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss