शिर्डीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ठाकरे आणि पवारांवर जोरदार हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी शहांचे अक्षरशः वाभाडे काढले. महापालिकेला एकट्याने सामोरे जाण्याची उध्दव ठाकरेंची इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली त्यावरही पवारांनी भाष्य करत शिवसेना सहजासहजी आपल्या पकडीतून सुटणार नाही हे समजावून सांगितलं.