लोकसभा निवडणुकीपासूनच सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्याने इथले राजकारण कायमचं धगधगते राहिले आहे. या विधानसभा निवडणुकीत पुंरदरमध्ये तिरंगी लढत होतेय. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्याने महायुतीत तिढा निर्माण झाला.