ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी EVM आणि गौतम अदाणींच्या विरोधात सुरु केलेलं आंदोलन तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोडलं. विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या EVM घोटाळ्याबाबत राज्यात २२ जणांनी फेरमोजणीचे अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. आढावांनी संशयास्पद वाटणाऱ्या EVM च्या गैरप्रकारावर बोट ठेवले आहे. त्यामुळे त्यांचं उपोषण थांबवलं असलं तरी EVM च्या विरोधातलं वातावरण त्यांनी तापवलं आहे.