पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून काम करत होती. तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरुन वाद सुरू होता. यातूनच आरोपीने हा हल्ला केला.