उद्धव ठाकरे यांची उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे सभा पार पडली. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने गेले होते. त्यावेळी हेलिपॅडवरून उतरताच उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहाय्य्क मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. त्यावेळी ते संतापले. मोदी – शहांची बॅग तपासली का? असा प्रश्न त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी विचारला.