संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याला २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या फोनचा रेकॅार्ड तपासल्यावर त्याचे मुख्य आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती बीड कोर्टात एसआयटीने दिली. त्यामुळे बुडत्या कराडचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.