मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याने पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी आंदोलन केले . त्यानंतर महायुती सरकारच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मंगळवारी मस्साजोग मध्ये सामूहिक आत्महत्या करण्यात येण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. वाल्मिक भोवतीचा फास आवळला जात असला तरी त्याला फार अपाय होऊ नये अशी काळजी घेतली जात असल्याचे एकूणच तपास यंत्रणा करत असलेल्या तपासकामावरून लक्षात येतेय.