बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सतत धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मीक कराड यांचं नाव समोर येत होतं. बीडमध्ये मूक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा विविध नेते देखील सामील झाले होते. या मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची आणि वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हा पासून वाल्मीक कराड हा फरार होता. आता 23 दिवसांनी वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आलाय.