मुंबईतील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला येत्या १९ जानेवारीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय क्रिकेट चाहते आणि मुंबईचे वानखेडे स्टेडियम यांचे अतुट नाते आहे. कारण या मैदानावरच भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकला, याच मैदानावर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली. तसेच, याच मैदानावर रवी शास्त्रीने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. वानखेडे स्टेडियम हे केवळ एक मैदान नाही तर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनिक आठवणींचे भांडार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची निर्मिती होण्यामागे एक कारण आहे. एका मराठी माणसाच्या अपमानानंतर वानखेडे स्टेडियमची उभारणी झाली आहे.
वानखेडेबाहेर ‘हिटमॅन’ च्या फॅन्सचा सामन्याआधीच जल्लोष, व्हिडीओ होतोय वायरल!