वाल्मीक कराडचे जवळचे समजले जाणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यानं या सगळ्याचा वापर ते करत असल्याचा आरोप होतोय आणि त्यांच्याकडचा निरोप अशा माणसांच्या वतीनं आत पाठवण्यात येतोय असंही बोलल्या जातंय. त्यामुळे वाल्मिक कराडला बाहेर काढण्यासाठी वेगळे डाव रचले जात आहेत. आता या सगळ्यांमध्ये ज्यांचं नाव पुढे येतंय ते म्हणजे अशोक थोरात. अशोक थोरात हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत. ते राजकीय इंक्लाइन पर्सन असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. त्यांना लोकसभेची आणि माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवायची होती. ते अगोदर बीडला होते. मग त्यांची बदली नाशिकला झाली. मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली असा दावा दमानिया यांनी केलाय.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजली दमानियांनी आरोप केलेले Ashok Thorat आहेत कोण ?