बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी हा रोग प्राणघातक आहे. परंतु, विशिष्ट परिस्थितीत तो माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असते. जगभरातील अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि त्यामुळे माणसांमध्ये या आजाराबद्दल भीती निर्माण झाली आहे. हा आजार मुख्यतः जंगली पक्षी आणि कोंबड्यांमध्ये आढळतो. परंतु, माणसांमध्ये संसर्ग झाल्यास तो अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच बर्ड फ्लूविषयी जागरूक राहणं, त्याची लक्षणं ओळखणं आणि योग्य खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे.