बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला. राज्याचे आणि राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर कोण आहेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम?