वाल्मिक कराड याला १४ दिवसांची CID कोठडी मिळाल्यांनतर त्याच्या सुरक्षेवरच विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे बदनाम होत असताना सरकारचीही नाचक्की झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची भीती व्यक्त केली आहे. त्याचवेळी धनंजय मुंडे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर निश्चित असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.