spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

रायगडात पालकमंत्री म्हणून कुणाचा राज्याभिषेक? | Raigad

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यानंतर या निर्णयाचे कुठे चांगले तर कुठे वाईट पडसाद उमटले. गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच या यादीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना डच्चू मिळाल्याने गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही तर या कार्यकर्त्यांनी महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला. रायगड जिल्ह्यातील एकूण ३२ गोगावले समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे देखील दिलेत. यामुळे आता महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद अजूनच चिघळण्याची दाट शक्यता आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती

Latest Posts

Don't Miss