मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या प्रकरणातील संताप जनक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या संतापाचा धसका घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘देवगिरी’ बंगला गाठला. त्यांनतर धनंजय मुंडे यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. धनंजय मुंडे राजीनामा देणार याबाबतचं वृत्त टाईम महाराष्ट्राने रविवारीच प्रसारित केलं होतं.