पालकमंत्री म्हणजेच एखाद्या जिल्ह्याचं पालकत्व घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा व्यक्ती.अलीकडेच या पदाबद्दल अनेक घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्या. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री आणि आमदारांमध्ये झालेला वाद, त्याशिवाय निधी वाटपामध्ये पालकमंत्र्यांनी अन्याय केला अशी झालेली ओरड, पण पालकमंत्री नेमकं काम काय करतात. तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे म्हणजेच डीपीसीचे अध्यक्ष असतात. जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेते. जिल्ह्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करते, विविध विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे शिफारस देखील करते.