महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने मोलाचा वाटा उचलला होता. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. आता महायुतीच सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळणारे पैसे बंद झाले नसले तरी आता काही पाच नव्या अटी पुढे आल्या आहेत असं दिसतंय