राजन साळवींच्या निमित्तानं कोकणातला एक भाग शिंदेच्या पारड्यात गेलाय. उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत बिकट असणाऱ्या या काळात आता काही दिवसांपासून भास्कर जाधवही नाराज आहेत आणि तेही लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पक्षात नाराज असलेल्या नेत्यांवरती कारवाई करण्याची आमच्यात ताकद नाहीये, अशी जाहीर नाराजी भास्कर जाधव यांनी बोलून दाखवत भूतकाळातल्या काही आठवणी सांगून त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरतीच अप्रत्यक्षपणे बोट ठेवलंय. आता त्यांच्या या वक्तव्यामुळेच तेही शिंदे सेनेत जातील की काय अशा चर्चा सध्या सुरू आहेत.