ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात. त्यापैकी मुलुंड विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. मुंबईच्या वेशीवर आणि ठाण्याच्या बाजूला अशी मुलुंड मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ भाजपाच्या गड मानला जातो. कारण, 1990 पासून इथं भाजपाची सत्ता आहे. यानंतर 1990 रोजी भाजपाचे वामनराव परब हे विजय झाले. तेव्हापासून भाजपानं आपला गड राखलाय. यानंतर 2019 मध्ये मिहिर कोटेचा यांनी निवडणूक लढवत पुन्हा एकदा भाजपाचा गड कायम राखला. या मतदारसंघात सरदार तारासिंग यांचं मोठं काम आणि नाव आहे. 2020 रोजी सरदार तारासिंग यांचं निधन झालं. आता इथून भाजपाचे मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. सध्या इथं भाजपाकडून मिहिर कोटेचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून राकेश शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रदीप शिरसाट निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत. त्यामुळं इथं तिरंगी लढत होणार आहे. तर या वेळेस मुलूंडवासी भाजपचा गड राखणार की नवीन उमेदवाऱ्याला निवडून देणार जाणून घेऊयात मुलुंडवासीं कडून.