महेश लांडगे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतायेत, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या मनात ते अधिक घट्ट बसतानाचे चित्र दिसतंय. आणि अजित गव्हाणे यांनीही विकासाच्या मुद्यावरच मांडणी करावी आणि भोसरी मतदार संघाचा व्हिजन मांडावं अशी भोसरीकरांची अपेक्षा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे भाजपात आणि महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेल्या माजी नगरसेवकाची भोसरीसह पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायमत चर्चा राहिलीये.