गूगलने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत साइन इन केले नसेल किंवा तुमचे खाते वापरले नसेल तर गूगल तुमचे खाते हटवणार आहे. हे धोरण तुमच्या वैयक्तिक गूगल खात्यावर लागू होते. तुमच्या कार्यालय, शाळा किंवा इतर संस्थेद्वारे तुमच्यासाठी सेट केलेल्या कोणत्याही गूगल खात्याला हा नियम लागू होत नाही. अशाप्रकारचे निष्क्रिय खाते हे घोटाळेबाज व ऑनलाईन स्कॅमर्ससाठी तयार संधी असते. या अकाउंट्सवर अन्य युजर्सची फसवणूक तुमच्या नावे होऊ नये यासाठी गूगलने अशी खाती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
आज १३ नोव्हेंबर जाणून घ्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना
दिल्लीत जोरदार आतषबाजी, AQI घातक ९६९ पातळीवर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.