शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. मात्र, तरीही खरी शिवसेना आमचीच ही गोष्ट नागरिकांच्या मनावर बिंबवण्यात शिंदे गट पूर्णपणे यशस्वी ठरला नव्हता. उद्धव ठाकरे यांनीही, ‘खरी शिवसेना आमचीच, दुसरा शिवसेना पक्ष असूच शकत नाही’, असे वारंवार सांगितले होते. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा फैसला करण्यासाठी विधानसभेची आमनेसामने होणारी लढाई ही महत्त्वपूर्ण मानली जाते.