महाराष्ट्रात सध्या एका IAS प्रशिक्षणार्थी अधिकारीचं नाव चर्चेत नाही तर वादात आलय. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSC च नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक आहे. कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त माजी आयएअस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.